Posted on March 8, 2008 by palashbiswaskl
|
|
| माकपा कार्यकत्यांच्या हल्ल्यात 7 ठार |
|
|
| कन्नूर, शनिवार, 8 मार्च 2008( 20:42 IST ) |
| भाषा |
|
|
|
|
|
|
थलसारीजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यापैंकी आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा आज मृत्यू झाला असून या मृत्यूमुळे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता सात झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे 65 वर्षीय कार्यकर्ता के. व्ही. सुरेंद्रन यांच्या थिरूंवगड येथील राहत्या घरात गुरुवारी रात्री माकपा कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने घुसून त्यांच्यावर चाकूने वार केला होता. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले होते.
त्यांना तत्काळ कोझिकोड मेडिकल कॉलेज रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला प्राण सोडला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल जिल्हाधिकार्यांनी एक बैठक बोलाविली होती.
या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपासह माकपा नेत्यांनीही सहभाग घेतला होता. तेव्हा एकमेकांच्या कार्यकर्त्यावर हल्ला न करण्याचा निर्णय या बैठकीत झाला होता. पण त्यानंतर काही वेळातच भाजपा कार्यकर्ता सुरेंद्रन यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.
केरळचे गृहमंत्री कोडियारी बालकृष्णन सध्या दिल्लीत असून लवकरच ते या भागाचा दौरा करतील असे सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता ओमन चंडी यांनी या हिंसाचाराबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून एकदिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले आहे.
| मणिपुर विधानसभेत बॉम्बस्फोट |
|
|
| इंफाळ, शनिवार, 8 मार्च 2008( 19:28 IST ) |
| भाषा |
|
|
|
|
|
|
मणिपुर विधानसभा भवन परिसरात आज दोन अज्ञात उग्रवाद्यांनी बॉम्बफोट केला. या बॉम्बस्फोटात कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या विधानसभा परिसरात सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट करून दोन अज्ञात उग्रवादी इंफाळ-दीमापुर महामार्गाच्या दिशेने पळून गेल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
कोणत्याही उग्रवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. विधानभवनाच्या चारही बाजूने व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था असून नेहमी गजबजलेला परिसर असतो.
बॉम्बस्फोटानंतर शहराबाहेर जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी तत्काळ बंद केले असून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी चालू आहे. |
| कर्ज माफी महिलांच्या हितासाठी- सोनिया |
|
|
| नवी दिल्ली, शनिवार, 8 मार्च 2008( 17:36 IST ) |
| भाषा |
|
|
|
|
|
|
देशातील शेतकर्यांच्या कर्ज माफीचा ऐतिहासिक निर्णय हा महिलांच्या हिताचा असून या निर्णयामुळे शेतकर्यांच्या आत्महत्येवर नियंत्रण येवून त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल असे कॉंग्रसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज एका कार्यक्रमात म्हटले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात त्यांच्याहस्ते पंधरा महिलांना ‘श्रम शक्ती पुरस्कार’ देण्यात आला. प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी महिला पुढे असते. शेतकर्यांच्या आत्महत्येनंतर कुटूंबाला सावरण्याची महत्त्वाचे काम महिला करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे 4 कोटी शेतकर्यांना फायदा होणार असून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यावेळी बोलत असताना त्यांनी कन्या भ्रूण हत्येविषयी चिंता व्यक्त केली. तसेच, अंगणवाडी सेविकेचे कौतुक करायलाही त्या विसरल्या नाहीत. याप्रसंगी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आपल्या पत्नीसह उपस्थित होते. |
|
|
| जयाप्रदाची दिवाळखोरी टळली |
|
|
|
| वार्ता |
|
|
|
|
|
|
मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देत समाजवादी पक्षाची खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या विरोधात दिलेला
दिवाळखोरीचा आदेश रद्दबादल ठरवला आहे.या आदेशानंतर जयाप्रदा यांना दिलासा मिळाला आहे.
दोन वर्षांपूर्वी जयाप्रदा यांच्या विरोधात हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. 500 दिवसांनंतर जया यांना अपील संबंधी विचारणा केली असता,जया या कर भरण्यास तयार असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने न्यायालयाला दिल्यानंतर न्यायमूर्ती रामासुब्रमण्यम यांनी जयाप्रदा यांच्या विरोधातील दिवाळखोरीचा आदेश रद्द केला. |
| राज ठाकरेंना समर्थन नाही- सलमान |
|
|
| मुंबई, शुक्रवार, 7 मार्च 2008( 17:54 IST ) |
| वेबदुनिया |
|
|
|
|
|
|
माझ्याविषयीची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांतून देण्यात येत असून, मनसे नेते राज ठाकरे यांना आपण कोणत्याही स्वरूपातून समर्थन केले नसल्याचा खुलासा बॉलीवूड स्टार सलमान खान याने केला आहे.
सलमानचे वडील सलीम खान यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून, उत्तर भारतीयांविरोधातील लढ्यात राज यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. यानंतर बॉलीवूडमध्ये या प्रकरणावरून मतभेद निर्माण झाले होते. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून सलमानने प्रसारमाध्यमापुढे आपली भूमिका मांडली.
आपण असे काहीच वक्तव्य दिले नसून, राज ठाकरे यांना आपला कोणताही पाठिंबा नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मी किंवा माझ्या परिवारातील कोणाचाही राज यांना पाठिंबा नसून, मुंबई उत्तर भारतीयांचीही असल्याचे तो म्हणाला. कृपया फिल्म इंडस्ट्रीत कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही त्याने दिला आहे. |
|
| त्रिपुरात डावे; मेघालयात कॉग्रेस |
|
|
|
| वेबदुनिया |
|
|
|
|
|
|
त्रिपूरा विधानसभेत आपले वर्चस्व सलग चौथ्यांदा सिद्ध करत डाव्या पक्षांच्या आघाडीने पुन्हा एकदा राज्याची सत्ता खेचून आणली आहे. साठ सदस्यांच्या या विधानसभेत डाव्या आघाडीला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी मेघालयात मात्र कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पक्षाला ५९ पैकी २५ जागा मिळाल्या आहेत.
त्रिपूरात डाव्या आघाडीत फॉरवर्ड ब्लॉक नव्हते. जागा वाटपावरून डाव्या आघाडीशी मतभेद झाल्याने या पक्षाने निवडणुकीत भाग घेतला नव्हता. मुख्यमंत्री माणिक सरकार धनपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. डाव्या आघाडीने या राज्यात १९९३ मध्ये सत्ता मिळवली होती. तेव्हापासून राज्यात पक्षाचे वर्चस्व अबाधित आहे. या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ४१, आरएसपीला २ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाली.
मेघालयात मावळत्या विधानसभेत आघाडी सरकार चालवत असलेली कॉंग्रेस पुन्हा एकदा याच भूमिकेत असेल असे दिसते. अपक्ष आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) व खून हेन्नियुत्रीप नॅशनल अवेकनिंग मूव्हमेंट (केएचएएएम ) या पक्षाच्या साथीने सरकार बनविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला चौदा जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीला ११, एचएसपीडीपीला दोन व केएचएएएम व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. |
|
| खबरदार इतिहास बदलू नका- प्रिंस तूसी |
|
|
| आग्रा, गुरूवार, 6 मार्च 2008( 17:09 IST ) |
| वार्ता |
|
|
|
|
|
|
जोधा- अकबरवरील बंदी आता जवळपास उठविण्यात आली असली तरी, या चित्रपटाचे ग्रहण अजून सुटले नाही.
करणी सेना, महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठाण, तसेच इतर काही संघटनांनी या चित्रपटा विरोधात जोरदार निदर्शने केल्यानंतर आता खुद्द मुगल साम्राज्याच्या वंशजांनीच या चित्रपटा विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
मुगल बादशहा बहादूरशहा जफर यांचे वंशज असलेल्या प्रिंस याकूब हबीबुद्दीन तूसी यांनी या चित्रपटावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.इतिहासाचा अभ्यास न करताच निर्मात्यांनी चित्रपट तयार केला असल्याचेही ते म्हणाले. |
|
|
|
|
|
Filed under: Uncategorized